धक्कादायक : दोन वर्षांत गुजरातेत १८४ सिंहांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:55 AM2018-03-07T01:55:03+5:302018-03-07T01:55:03+5:30

गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.

Shocking: 184 lions die in Gujarat in two years | धक्कादायक : दोन वर्षांत गुजरातेत १८४ सिंहांचा मृत्यू

धक्कादायक : दोन वर्षांत गुजरातेत १८४ सिंहांचा मृत्यू

googlenewsNext

अहमदाबाद -  गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.

गुजरातमध्ये २०१५मध्ये करण्यात आलेल्या गणनेमध्ये तिथे ५२३ सिंह असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन वर्षांच्या आकडेवारीतून हे दिसते की दरवर्षी एकूण सिंहांपैकी १८ टक्के मरण पावतात. सिंहांची संख्या ज्या दराने वाढत आहे, त्याच्या तुलनेत मृत्यू दर हा सामान्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिंहांच्या मृत्यूचा दर विचारात घेतला तर सिंहांच्या संख्येत दरवर्षी दोन टक्के वाढ होत आहे.

सिंहाचे 100 छावे जन्माला आले तर वयाच्या तीन वर्षांपर्यंत त्यातील फक्त 36 जगतात.

सिंहांच्या मृत्यूमध्ये तीन वर्षांच्या आतील छाव्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तिथे २०१६मध्ये १२ सिंहांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता व त्या वर्षी मरण पावलेल्या एकूण सिंहांमध्ये हे प्रमाण १२ टक्के होते. तथापि, २०१७मध्ये सिंहांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण एकदम २५ टक्क्यांवर गेले. त्या वर्षी ८० सिंह मरण पावले त्यात २० सिंहांचा मृत्यू अनैसर्गिक होता.

दोन महिन्यांत 106 बिबट्यांचा मृत्यू

देशात या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल १०६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाने गोळा केलेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक मृत्यू हे शिकारीमुळे झाले आहेत.
२०१७मध्ये ४३१ बिबटे मरण पावले होते. त्यापैकी १५९ शिकारीचे बळी होते. त्याआधी २०१६मध्ये ४५० बिबिटे मरण पावले, त्यातील १२७ बिबट्यांचा मृत्यू शिकारीत झाला होता.

बिबट्याची कातडी व शरीराचे इतर अवयव ज्या पद्धतीने गायब झाले होते, त्यावरून हे स्पष्ट झाले. फक्त १२ बिबटेच नैसर्गिक कारणांनी मरण पावले. सगळ्यात जास्त बिबटे (२४) उत्तराखंडमध्ये मरण पावले. त्याखालोखाल महाराष्ट्रात १८ व राजस्थानात ११ बिबट्यांचा मृत्यू झाला. १८ राज्यांतून बिबट्यांच्या मृत्यूची माहिती घेण्यात आली.

Web Title: Shocking: 184 lions die in Gujarat in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.