शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 10:42 PM2017-08-22T22:42:15+5:302017-08-22T22:44:47+5:30

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली.  

Shivshahar Babasaheb Purandare and Prime Minister Narendra Modi's visit to Delhi | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झाली भेट

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झाली भेट

googlenewsNext

नवी दिल्ली, दि. 22 - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली.  
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे.  वयाच्या 96 व्या वर्षीही ते शिवचरित्राच्या प्रसारासाठी कार्य करत आहेत. भेटीची छायाचित्रे शेअर करताना मोदींनी पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट झाली. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. तसेच त्यांचा आदर करतो, असे मोदींनी म्हटले आहे.  
या भेटीवेळी पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा सरदार वापरत तशी जरीची पगडी आणि उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला. बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. असेही मोदींनी म्हटले आहे.  






माझ्या सर्व यशाचे श्रेय वडिलांना -  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
 ‘वडील हे माझे सर्वात जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांना वाव दिला. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय मी त्यांना देईन,’ असे प्रतिपादन करत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वरगंधार’ आणि ‘जीवनगाणी’ संस्थेने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष किशोर रांगणेकर उपस्थित होते.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ‘आपला वारसा मुलांकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे.’

Web Title: Shivshahar Babasaheb Purandare and Prime Minister Narendra Modi's visit to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.