Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:51 AM2019-07-21T11:51:04+5:302019-07-21T11:55:56+5:30

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

sheila dikshit former cm delhi son sandeep dikshit congress | Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील'

Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील'

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले.शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

नवी दिल्ली  - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी (20 जुलै) निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 'माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. मी तिला गमावले आहे. आई गमावल्याचे दुःख विसरता येत नाही. जेव्हा जेव्हा दिल्लीच्या विकासाबाबत लोक बोलतील तेव्हा शीलाजींची नेहमीच आठवण काढतील' अशा भावना संदीप दीक्षित यांनी व्यक्त केल्या आहेत. शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शीला दीक्षित यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. 


काँग्रेसमधील सामर्थ्यशाली नेत्या समजल्या जाणाऱ्या शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च  1938 मध्ये पंजाबमधील कपूरथलामध्ये झाला. दिल्लीतील कॉन्वेंट ऑफ जीसस एँड मेरी स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून त्यांना एमएची पदवी घेतली. 1984 ते 1989 या कालावधीत त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या कन्नौजचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढे त्या दिल्लीचा चेहरा झाल्या. दिल्लीतील अनेक विकासकामं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली. 


सर्वाधिक काळ दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान दीक्षित यांच्याकडे जातो. 1998 ते 2013 या कालावधीत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली.

Former Delhi CM and Congress leader Sheila Dikshit passes away in Delhi | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. शीला दीक्षित यांच्या निधनानं दु:ख झालं. त्यांनी दिल्लीच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांसोबत आहेत, असं ट्विट मोदी यांनी केलं होतं.  काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्तानं धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत, त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत', अशा शब्दांमध्ये गांधींनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.




शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेश

शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय असलेल्या शीला दीक्षित यांनी निधन होण्यापूर्वी काही काळ आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेली अडवणूक न थांबल्यास  काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. दरम्यान, या आवाहनानंतर काही काळानेच शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने त्यांनी दिलेला हा संदेश शेवटचा संदेश ठरला. 


शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या किरण वालिया यांनी सांगितले की, ''शीला दीक्षित यांनी आपल्या शेवटच्या संदेशामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्या स्वत: आंदोलनासाठी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीमधील कार्यकारी अध्यक्ष हारुन युसूफ हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार होते.''




 

Web Title: sheila dikshit former cm delhi son sandeep dikshit congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.