EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:09 PM2019-05-22T12:09:18+5:302019-05-22T12:10:00+5:30

तुमचं कोणीही ऐकणार नाही, लिहिण्याने काही होणार नाही, रस्त्यावर उतरावं लागेल. जर देशातील या इग्रजांविरोधात लढायचं असेल तर आंदोलन करावं लागेल

The serious allegations made by the Congress leader on the Supreme Court | EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदित राज यांनी सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएम मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल होतात. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी अशी मागणी होत असताना व्हीव्हीपॅटची पावत्यांची मोजणी करावी असं सुप्रीम कोर्टाला का वाटत नाही? का ते देखील या गडबडीत सहभागी आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. 

उदित राज यांनी बुधवारी ट्विट करत निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कामं तीन महिने संथगतीने होतात. तर मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले तर काय फरक  पडतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाला ईव्हीएम बदलायची असेल त्या बदलल्या असतील. त्यासाठी निवडणुका सात टप्प्यात घेण्यात आल्या. तुमचं कोणीही ऐकणार नाही, लिहिण्याने काही होणार नाही, रस्त्यावर उतरावं लागेल. जर देशातील या इग्रजांविरोधात लढायचं असेल तर आंदोलन करावं लागेल असं त्यांनी सांगितले. 


 17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा रविवारी शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


एनडीएला यंदा 306 जागा मिळण्याचा अंदाज TIMES NOW-VMR 2019 Exit Pollमधून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांना 104 जागा मिळण्याचा कयास बांधला जात आहे. तर एनडीएला 41.1 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यूपीएला 31.7 टक्के मतं मिळतील, तर इतरांना 27.2 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे. मात्र विरोधकांनी एक्झिट पोलवर विश्वास नसून प्रत्यक्ष निकालात चित्र वेगळं असेल असा दावा केला आहे. 

Web Title: The serious allegations made by the Congress leader on the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.