दोन सामूहिक बलात्कारांनी खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 03:48 AM2018-01-16T03:48:20+5:302018-01-16T03:48:39+5:30

दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी, असाच भयंकर प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. जिंद जिल्ह्यातील १५ वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

Sensation by two gang rape | दोन सामूहिक बलात्कारांनी खळबळ

दोन सामूहिक बलात्कारांनी खळबळ

Next

कुरुक्षेत्र : दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी, असाच भयंकर प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. जिंद जिल्ह्यातील १५ वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले असून, तिचा चेहरा, डोके, छाती, हात व गुप्तांगावर जखमा असल्याचे डॉ. एस. के. दत्तरवाल यांनी सांगितले. दहावीत शिकणारी ही मुलगी ९ जानेवारीपासून बेपत्ता होती. त्याच दिवशी गावातील तरुणही बेपत्ता झाला. हे दोघेही पळून गेले असावेत, असा संशय मुलीच्या पालकांना आल्याने त्यांनी तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार केली.
शुक्रवारी जिंदमधील कालव्यात एका मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. तो त्या मुलीचा असल्याचे उघड झाले. मुलीच्या शरीरावरील जखमा पाहता तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी चार पथकांद्वारे तपास सुरू केला असून, एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे हरयाणात संताप व्यक्त होत आहे. मुलगी दलित होती. संशयित तरुणही दलित आहे. त्यानेच हे कृत्य केले की अन्य कोणी केल्याचे उघड झालेले नाही.
या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, कुटुंबातील
एकाला सरकारी नोकरी व निर्भया फंडामधून आर्थिक साह्य द्या, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्यायमंत्री कृष्णकुमार बेदी यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

बलात्कार करून
फेकून दिले
फरिदाबाद : हरयाणाच्या फरिदाबाद शहरातही २३ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला रात्री सिक्री या गावापाशी फेकून देण्यात आले. ही महिला शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी येत होती. ती मोबाइलवर बोलत चालली असताना मागून आलेल्या स्कॉर्पिओमधील चौघांनी तिला कारमध्ये खेचले. त्यानंतर दोन तास तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

चंदीगड : एका १0 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ५0 वर्षांच्या इसमाला अटक केली आहे. तो पीडितेचा लांबचा नातेवाईक असल्याचे समजते. मुलीच्या गुप्तांगात त्याने लाकडी वस्तू खुपसण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. ती मुलगी त्या वेदनेने जोरात रडू लागल्याने आईने तिला लगेच रुग्णालयात नेते. तेव्हा असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. मात्र मुलीवर बलात्कार झालेला नाही, असे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अनेक वर्षे हरयाणात राहत आहे.

आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. रेवाडीमधील बलात्कार आणि खून प्रकरणात तीन जणांना फाशीची शिक्षा झाली आहे. महिला आणि मुलींकडून आलेली प्रत्येक तक्रार नोंदवून घ्यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
- ममता सिंह, पोलीस महासंचालक

महिलांविरुद्ध गुन्हे वाढले आहेत. सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांमुळे महिलांना लक्ष्य केले जात आहे.
- प्रीती भारद्वाज, हरयाणा राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा

हरयाणात दररोज चार महिलांवर बलात्कार
हरयाणात महिलांविरुद्धचे अत्याचार दीड वर्षात वाढले असून पोलिसांच्या ‘क्राइम अगेन्स्ट वूमेन’च्या धक्कादायक आकडेवारीनुसार, राज्यात रोज चार महिलांवर बलात्कार होत असल्याची माहिती समोर येत आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २0१७ या काळात १२३८ महिलांवर बलात्कार झाले. तर, विनयभंगाच्या २०८९ घटना घडल्या.

सरकार संवेदनशील नाही; काँग्रेसचा आरोप
केंद्र सरकार महिला आणि मुलींसाठी अनेक योजना राबवित आहे. ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ यासारख्या योजना भलेही मुलींना झुकते माप देत असतील; पण, पोलिसांच्या आकडेवारीने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांविरुद्धच्या अत्याचाराबाबत हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप हरयाणा प्रदेश काँग्रेस समितीच्या महिला शाखेच्या प्रवक्त्या रंजीता मेहता यांनी केला आहे.


महिलांविरुद्धचे अत्याचार
(१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर)
प्रकरणे २०१६ २०१७
हुंडाबळी २४९ २२९
बलात्कार ११५६ १२३८
बलात्काराचा प्रयत्न १२५ १४१
विनयभंग १७१९ २०३९
छेडछाड २२१ २८५
अपहरण १८२२ २४३२
हुंड्यासाठी छळ २९९५ ३०१०
अनैतिक तस्करी ७६ ७४
पीसी-पीएनडीटी
कायद्याचे उल्लंघन ६६ ४५
अ‍ॅसिड हल्ले ९ ५
महिला तस्करी ९ १५
हुंडा प्रतिबंधक ५ १०

Web Title: Sensation by two gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.