ज्येष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:50 PM2019-03-25T14:50:49+5:302019-03-25T14:51:22+5:30

लखनौ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अल्वी यांना उत्तर ...

Senior Congress leader Rashid Alvi refused to contest the election | ज्येष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार 

ज्येष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार 

Next

लखनौ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अल्वी यांना उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान,  अल्वी यांनी आपल्या या निर्णयाची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली असून,  रशिद अल्वी यांच्याऐवजी सचिन चौधरी यांनी अमरोहा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने रशिद अल्वी नाराज झाले होते. अखेरीस आठव्या यादीमध्ये त्यांना अमरोहा येथून उमेदवारी जाहीर झाली होती. अमरोहा येथून भाजपाने कंवर सिंह तंवर तर बसपाने दानिश अली यांना उमेदवारी दिली आहे. मात्र राशिद अल्वी यांनी ऐनवेळी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 





 काँग्रेसचे माजी प्रवक्ते असलेल्या राशिद अल्वी यांनी 1999 ते 2004 या काळात खासदार म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर दोन वेळा त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक  जिंकण्यासाठी काँग्रेसने गठित केलेल्या समितींपैंकी जाहीरनामा समितीचे प्रमुखपद राशिद अल्वी यांच्याकडे देण्यात आले होते.

 काँग्रेसने उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, पश्चिम उत्तर प्रदेशमधील चार मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मुरादाबाद येथून इम्रान प्रतापगढी यांना, तर बिजनौर येथून नसीमुद्दीन सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहारनपूर येथून इम्रान मसूद यांना तर अमरोहा येथून राशिद अल्वी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता राशिद अस्वी यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, या चारही मतदरासंघांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

Web Title: Senior Congress leader Rashid Alvi refused to contest the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.