जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 09:16 AM2019-01-26T09:16:26+5:302019-01-26T10:53:34+5:30

श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Security forces neutralise two terrorists during encounter in Khonmoh, Srinagar | जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Next
ठळक मुद्देदोन दहशतवाद्यांचा खात्माप्रजासत्ताक दिनी भारतीय लष्कराला मोठे यशखोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर - प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मिळालेल्या माहितीनुसार, आताही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी (25 जानेवारी) दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. 

खोनमोह येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 



 


Web Title: Security forces neutralise two terrorists during encounter in Khonmoh, Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.