अहमदाबादमधील हॉटेलमध्ये राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात गुप्त बैठक, गुजरात निवडणुकीबाबत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 08:08 PM2017-10-23T20:08:56+5:302017-10-23T20:12:21+5:30

गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

Secret meeting between Rahul Gandhi and Hardik Patel in Ahmedabad hotel, discuss about Gujarat elections | अहमदाबादमधील हॉटेलमध्ये राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात गुप्त बैठक, गुजरात निवडणुकीबाबत खलबते

अहमदाबादमधील हॉटेलमध्ये राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात गुप्त बैठक, गुजरात निवडणुकीबाबत खलबते

Next

अहमदाबाद -  गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून  या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. तसेच हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांनीही अशाप्रकारच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  
दरम्यान,  हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांची फोडाफोडी करणाऱ्या  भाजपाला आज डबल झटका बसला होता.  नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आज निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले होते. मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पूर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचे निखिल सवानी बोलले. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत. 
निखिल सवानी यांच्याआधी नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. यावेळी नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. मात्र निखिल सवान यांनी आपल्याला पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे. 
 

Web Title: Secret meeting between Rahul Gandhi and Hardik Patel in Ahmedabad hotel, discuss about Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.