लग्न सोहळ्यात हवेत गोळीबार, डान्सर तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 01:57 PM2019-02-23T13:57:20+5:302019-02-23T14:50:49+5:30

बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

saharsa bihar news in hindi dancer shot dead in a wedding function by a drunk me | लग्न सोहळ्यात हवेत गोळीबार, डान्सर तरुणीचा मृत्यू

लग्न सोहळ्यात हवेत गोळीबार, डान्सर तरुणीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देबिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे.

सहरसा - बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तीने बंदुकीने डान्सरवर पैसे उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीतून सुटलेली गोळी डान्सरला लागली आणि तिचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील सहरसा जिल्ह्यात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या गोळीबारात महिला डान्सरचा मृत्यू झाला. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्केस्ट्राची व्यवस्था करण्यात आली होती. नाइट क्वीन या ऑर्केस्ट्रात काम करणारी आकृति सिंह ऊर्फ मधू ही तिचा डान्स सादर करत असतानाच तिच्यावर पैशाची उधळण करण्यात आली. तसेच गोळीबार करण्यात आला त्यामध्ये मधूचा मृत्यू झाला. गोळी लागताच तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मधूचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: saharsa bihar news in hindi dancer shot dead in a wedding function by a drunk me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.