एस. एम. कृष्णा यांच्या जावयावर प्राप्तिकराचे छापे, सीसीडीचा मालक : शेअर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:39 AM2017-09-22T04:39:24+5:302017-09-22T04:39:27+5:30

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे घातले.

S. M. Receipt of tax on Krishna's son-in-law, owner of CDD: shares collapsed | एस. एम. कृष्णा यांच्या जावयावर प्राप्तिकराचे छापे, सीसीडीचा मालक : शेअर कोसळले

एस. एम. कृष्णा यांच्या जावयावर प्राप्तिकराचे छापे, सीसीडीचा मालक : शेअर कोसळले

Next


बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे घातले. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे (सीसीडी) ग्रुपचे संस्थापक, मालक व अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ १७ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीचे अध्यक्ष झाले.
प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनुसार, सीसीडीच्या येथील कार्यालयासह आयकर शाखेने मुंबई, चेन्नर्ई, बंगळुरू व चिकमंगरूळसह देशातील २०पेक्षा जास्त ठिकाणी झडती घेतली. सीसीडीचे भारतात आऊटलेट्स आहेत. मार्इंडट्रीसह माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांमध्येही सिद्धार्थ यांचा हिस्सा आहे. कॉफी बियांची निर्यात करणारी देशातील त्यांची सर्वांत मोठी कंपनी आहे. या धाडीनंतर शेअर बाजारात कॉफी डे इंटरप्राइजेसचे शेअर भाव दणक्यात कोसळले.
>काँग्रेस ते भाजपा
एस. एम. कृष्णा यांनी मार्च महिन्यात काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. ते काही काळ महाराष्ट्राचे राज्यपाल व त्याआधी केंद्रातही मंत्री होते. कृष्णा यांनी भाजपामध्ये प्रवेश करूनही, त्यांना अडचणीत आणण्यात आले आहे.

Web Title: S. M. Receipt of tax on Krishna's son-in-law, owner of CDD: shares collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.