‘मोदी केअर’ योजनेचा प्रीमियम १००० रुपये?  १० कोटी कुटुंबांना ५ लाखांचा आरोग्य विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:15 AM2018-06-08T06:15:20+5:302018-06-08T06:15:20+5:30

मोदी केअर आरोग्य विमा योजनेचा हप्ता (प्रीमियम) १००० ते १०५० रुपयांच्या दरम्यान असायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा व अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे.

Rs 1,000 for 'Modi Care' scheme? 10 crores families health insurance of 5 lakhs | ‘मोदी केअर’ योजनेचा प्रीमियम १००० रुपये?  १० कोटी कुटुंबांना ५ लाखांचा आरोग्य विमा

‘मोदी केअर’ योजनेचा प्रीमियम १००० रुपये?  १० कोटी कुटुंबांना ५ लाखांचा आरोग्य विमा

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : मोदी केअर आरोग्य विमा योजनेचा हप्ता (प्रीमियम) १००० ते १०५० रुपयांच्या दरम्यान असायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा व अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. या योजनेचा शुभारंभ मोदी १५ आॅगस्ट रोजी करणार आहेत.
सार्वजनिक आणि खासगी विमा कंपन्यांपेक्षा हा हप्ता खूपच कमी आहे. निती आयोग, अर्थ मंत्रालय व आरोग्य मंत्रालयाने चर्चा करून प्रथम १९०० रुपयांचा हप्ता सुचविला. तो नंतर १६५० व पुन्हा १२५० रुपये करण्यात आला होता. या योजनेद्वारे द्वितीय व तृतीय दर्जांच्या हॉस्पिटलसाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांच्या विमा संरक्षणाची योजना तयार होत आहे. मोदी केअरला अंतिम स्वरूप दिले जात आहे. याचा निर्णय नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांच्या १४ जूनच्या परिषदेत होईल. पंतप्रधान लाल किल्ल्यावरील भाषणातून त्याची घोषणा करतील. संपूर्ण कुटुंबाला यातून संरक्षण मिळेल. देशातील १0 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळू शकेल. केंद्र सरकार मोदी केअरसाठी ५० टक्के खर्च करेल. राज्यांनाही यात सहभागी करायचे आहे. काही राज्यांची स्वत:च्या योजनांत दुरुस्ती करण्याची इच्छा नसल्याने १४ जूनची बैठक महत्त्वाची आहे.

रूपरेषा निश्चितीनंतर योजनेच्या निविदा
वार्षिक हप्ता कुटुंबामागे एक हजार रुपये म्हणजे परवडणारा असावा, अशी मोदींची इच्छा आहे. योजनेची रूपरेषा निश्चित झाली की योजनेच्या निविदा जाहीर होतील. मोदी केअर सुरू करण्याआधी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (हप्ता ३३० रुपये), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (हप्ता १२ रुपये) बंद केल्या जातील.

Web Title: Rs 1,000 for 'Modi Care' scheme? 10 crores families health insurance of 5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य