पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 12:00 PM2019-06-06T12:00:49+5:302019-06-06T12:03:09+5:30

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

rld will fight solo in up by election | पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील निवडणुकीचं रणसंग्राम लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील कायम आहे. लोकसभा निवडणुकीत युती सपशेल अपयशी ठरल्यानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आगामी विधानसभा पोटनिवडणूक एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युतीतील राष्ट्रीय लोकदल पक्षाने देखील 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.

राष्ट्रीय लोकदलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सपा आणि 'बसपा'प्रमाणे आपण देखील एकट्याने पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. उत्तर प्रदेशात ११ विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र अजुनही युतीवर चर्चा होणार असल्याचे रालोदचे उत्तर प्रदेश अध्यक्ष मसूद अहमद यांनी सांगितले.

दरम्यान पोटनिवडणुक लढविण्यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित सिंह आणि अजित चौधरी करणार असल्याचे अहमद यांनी सांगितले. तसेच पोटनिवडणुकीत किती मतदारसंघात रालोद निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित झालं नसल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

याआधी लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा पक्षांना युती करूनही अपेक्षीत यश आले नाही. त्यानंतर लोकसभा निवडणूक निकालाच्या १० दिवसानंतरच बसपा प्रमुख मायावती यांनी पोटनिवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी अटी आणि शर्तीवर 'सपा'सोबत 'ब्रेकअप' झाले नसल्याचे म्हटले होते.

 

Web Title: rld will fight solo in up by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.