रिओ चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 1:52am

नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नैफियु रिओ यांनी गुरुवारी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल पद्मनाभआचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे वाय. पॅट्टन यांनाही शपथ दिली गेली. राज्यपालांनी रिओ यांना सभागृहात १६ मार्चला बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सांगितले आहे.

कोहिमा - नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नैफियु रिओ यांनी गुरुवारी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल पद्मनाभआचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे वाय. पॅट्टन यांनाही शपथ दिली गेली. राज्यपालांनी रिओ यांना सभागृहात १६ मार्चला बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सांगितले आहे. रिओ यांचा पक्ष राज्यात भाजपासोबत पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्सच्या नावाखाली सत्तेत आला आहे. ‘आम्ही बदल घडवू, आम्ही सगळ्या घटकांसाठी काम करू. आम्ही कोणालाही मागे राहू देणार नाही,’ असे रिओ शपथविधीनंतरच्या भाषणात म्हणाले. आचार्य यांनी दहा मंत्र्यांनाही पदाची शपथ दिली, त्यात सहा जुने आहेत. ६० सदस्यांच्या विधानसभेत ३२ आमदारांच्या पाठिंब्यावर रिओ यांनी सरकार स्थापन करण्यासाठी ४ मार्च रोजी दावा केला होता.

संबंधित

माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन
दोन नगरसेवक पुन्हा निलंबित
मिटमिटा दंगल घडविण्यामागे मनपाचे अधिकारी?
राज ठाकरेंची टीका भाजपाला झोंबली, पोलिसात दाखल केली तक्रार
मुंबईत जी मजा आहे, ती दिल्लीत नाही- नितीन गडकरी

राष्ट्रीय कडून आणखी

राहुल गांधींच्या भाषणापासून प्रेरित होऊन गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा
त्याच्या बँक खात्यावर अचानक जमा झाले 10 कोटी अन्
काँग्रेस मेलेल्या माणसांवरूनही राजकारण करतोय; सुषमा स्वराज यांची चपराक
पतीच्या अंत्यसंस्कारांसाठी शशिकला 15 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर
'2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार, त्यांची बरोबरी करण्यास कुणीही सक्षम नाही!'

आणखी वाचा