अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:06 PM2018-09-26T12:06:57+5:302018-09-26T12:24:23+5:30

देशातील बेरोजगारीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण

Report! The country has found major unemployment of the last 20 years, the most unemployed youth | अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

Next

नवी दिल्ली - देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या 20 वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण 2015 मध्ये 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून 16 टक्के तरुणाई जॉबलेस आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) च्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 20 वर्षांच्या कालवधीत सर्वात अधिक आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार देशातील 82 टक्के महिलांना आणि 92 टक्के पुरुषांना 10 हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक वेतन मिळत आहे. 

देशातील बेरोगजगारीचे खरे कारण हे कमी पगार आणि अंडरएम्पॉयलमेंट (कॉन्टॅक्ट किंवा कमी रोजगार) आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. तर, नवीन आर्थिक धोरणांनुसार बेरोजगारीची मोठी समस्या उद्भवू शकते, असा धोकाही या अहवालातून समोर आला आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण जवळपास 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. या अहवालासाठी दिग्गज पत्रकार, संशोधक, पॉलिसीमेकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यासाठी 2015-16 या वर्षातील एंप्लॉयमेंट आणि अनएंप्लॉयमेंट सर्व्हे (EUS), नॅशनल सॅम्पल सर्व्हे यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.

Web Title: Report! The country has found major unemployment of the last 20 years, the most unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.