'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:44 AM2019-06-10T10:44:00+5:302019-06-10T10:45:23+5:30

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या कुटुंबीयांची साथ मिळाली नाही. अखेर त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. 

Repeated falsehood speaking family did not arrive at the last minute | 'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण 

'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण 

Next

कुरुक्षेत्र - लहानपणी तुम्ही एक गोष्ट नक्की ऐकली असेल. एक मेंढपाल मुलगा मेंढ्या घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. एकेदिवशी या मुलाने लोकांची गमंत करायची म्हणून जोरजोरात लांडगा आला रे आला असं ओरडला. लोकांना ते खरे वाटले, गावकऱ्यांनी शेतातली कामे सोडून हातात काठ्या घेऊन मुलाच्या दिशेने धावत आले. कुठे आला लांडगा? असं लोकांनी विचारल्यावर मोठमोठ्याने हसत म्हणाला कशी गमंत केली. त्या मेंढपाल मुलाने दोन-तिनदा अशीच लोकांची फजिती केली मात्र प्रत्यक्षात जेव्हा लांडगा आला तेव्हा एकही गावकरी त्याच्या मदतीस धावला नाही. त्यामुळे लांडग्यांने त्यांच्या मेंढ्या फस्त केल्या. ही गोष्ट सांगण्यामागे कारणही तसेच आहे. प्रत्यक्ष अशी घटना घडली आहे ती हरियाणातील कैथल गावामध्ये. 

कैथल गावातील एक व्यक्ती नेहमी आपल्या कुटुंबीयांना अपघातात जखमी झाल्याची खोटी बतावणी करत असे. मात्र यावेळी खरोखरच या व्यक्तीचा अपघात झाला तेव्हा कुटुंबीयांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या कुटुंबीयांची साथ मिळाली नाही. अखेर त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. 

कैथल गावातील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, 1 जून रोजी संध्याकाळी मृतक व्यक्तीचा त्याच्या भावाला फोन आला होता. त्याने सांगितले की जोगना खेडा या गावादरम्यान त्याचा रोड अपघात झाला आहे. त्यात तो जखमी झाला आहे. सध्या कुरुक्षेत्रातील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 2 जूनला परत हा फोन आला. मात्र नेहमीप्रमाणे हा खोटा बोलत असेल असं वाटल्याने कुटुंबीयांनी त्या फोनकडे दुर्लक्ष केले. कारण याआधी अनेकदा अशाप्रकारे त्यांने फसवलं होतं. पण 7 जून रोजी संध्याकाळी आलेल्या फोनवर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना कळाली. पोलिसांनी ही माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना दिली. त्यामुळे कैथल गावातील गावकऱ्यांवर शोककळा पसरली, पोलिसांनी संबंधित घटनेत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आणखी तपास करत आहेत. 
 

Web Title: Repeated falsehood speaking family did not arrive at the last minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.