रिलायन्स जिओमध्ये 'मेगा'भरती; 80 हजार जणांना मिळणार नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 10:12 PM2018-04-26T22:12:43+5:302018-04-26T22:12:43+5:30

चालू आर्थिक वर्षात जिओमध्ये मोठी भरती होणार

Reliance Jio to hire about 80000 people in FY19 says Official | रिलायन्स जिओमध्ये 'मेगा'भरती; 80 हजार जणांना मिळणार नोकऱ्या

रिलायन्स जिओमध्ये 'मेगा'भरती; 80 हजार जणांना मिळणार नोकऱ्या

Next

मुंबई: चालू आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 57 हजार इतकी आहे. लवकरच यामध्ये 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. 

सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार का, असा प्रश्न संजय जोग यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला जोग यांना होकारार्थी उत्तर दिलं. कंपनीनं देशभरातील सहा हजार महाविद्यालयांशी करार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यामध्ये तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या संस्थांमधील काही अभ्यासक्रम रिलायन्स जिओच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार रिलायन्स जिओमध्ये काम करण्यासाठी अगदी योग्य ठरतील, असं जोग यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरती करण्यात येईल, अशी माहितीदेखील जोग यांनी दिली.
 

Web Title: Reliance Jio to hire about 80000 people in FY19 says Official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.