गुजरात राज्यातून येणा-या साईभक्तांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:51 PM2019-06-04T15:51:27+5:302019-06-04T16:22:52+5:30

सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतीपथावर

 Relaxation to the devotees coming from Gujarat state | गुजरात राज्यातून येणा-या साईभक्तांना दिलासा

गुजरात राज्यातून येणा-या साईभक्तांना दिलासा

Next
ठळक मुद्देरस्त्यावर अनेक छोटेमोठे खड्डे पडले होते. रस्त्याचे काम व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टतील शिर्डी, शनिशिंगणापूर या ठिकाणी येणा-या भाविकांसाठी महत्वपूर्ण असणारा सुरत ते शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे.
गोदाकाठची मुख्य बाजारपेठ असणा-या सायखेडा पासून जवळपास असणा-या सर्व छोट्या खेड्यात जाणारे रस्ते वर्दळीचे आहे, सायखेड्यापासून पूर्वेला असणारी अनेक छोटी खेडी आणि गुजरात राज्यातून शिर्डीकडे जाणारे सर्व भाविक यांचा रहदारीचा असणारा सुरत ते शिर्डी महामार्ग सायखेडापासून भेंडाळी पर्यंत खराब झाला होता. रस्त्यावर अनेक छोटेमोठे खड्डे पडले होते. रस्त्याचे काम व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
सिन्नर ,कोपरगाव तालुक्यातील अनेक गावे नाशिकला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. गोदाकाठ भागातील शेतीमाल नाशिक, पिंपळगाव,सायखेडा, ओझर या बाजार समितीत विक्र ीसाठी घेऊन जातांना एकमेव हाच रस्ता आहे. गोदाकाठ भागातील पूर्वेकडील अनेक गावांमधील ग्रामस्थ सायखेडा येथे सातत्याने येतात, ते याच मार्गाचा वापर करतात. गुजरात राज्यातून येणारे अनेक भाविक या रस्त्याचा वापर करतात. जवळचा आणि नाशिक,सिन्नर या शहरातून जावे लागत नसल्याने हा पर्यायी रस्ता वापरला जातो. ओझर ते सायखेडा पर्यंत काम पूर्ण झाले होते. सायखेडापासून पुढे मात्र रस्त्यावर अनेक छोटेमोठे खड्डे पडले होते. प्रवाशांना वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत होती.

Web Title:  Relaxation to the devotees coming from Gujarat state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक