लवकरच येणार 50 रूपयांची नोट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 06:56 PM2017-08-18T18:56:12+5:302017-08-18T20:12:36+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती.

RBI may release 50 rupees note soon pics viral | लवकरच येणार 50 रूपयांची नोट, फोटो झाले व्हायरल

लवकरच येणार 50 रूपयांची नोट, फोटो झाले व्हायरल

Next

मुंबई, दि. 18 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. आता लवकरच  50 रूपयांची नोट चलनात येणार आहे. आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे.  पुढील महिन्यात दस-याला या नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. नव्या नोटा आल्यावर 50 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये 50 रूपयांच्या नव्या नोटचे फोटो व्हायरल झाले आहेत.  
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नोटबंदी जाहीर केली. 1000 आणि 500 च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने 2000 आणि 500 च्या नोटा चलनात आल्या आहेत. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.
500 रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे, तर 2 हजार रूपयांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे. सोशल मीडियात व्हायरल होणा-या फोटोनुसार या नोटचा रंग मयुर पंखी (साधरण हिरवा) असणार आहे. या नोटेवरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तसंच गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. या नोटेची प्रिटिंग आणइ डिझाइन 500 आणि 2000 रूपयांच्या नोटांप्रमाणेच असणार आहे.  या नोटांच्या मागील बाजूस दक्षिणेकडील प्रसिद्ध हंपी मंदिराचा फोटो असणार आहे. 
200 रुपयांची नोट लवकरच चलनात-
लवकरच 200 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. काही दिवसात या नोटेची छपाई सुरु होऊन महिनाभरात ही नोट चलणात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
नंदुरबार शहरासह तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव शहर व तालुक्याच्या विविध भागात 10 रूपयांची नाणी स्विकारली जात नसल्याच्या तक्रारी गेल्या चार दिवसात सातत्याने वाढल्या आहेत़ 
10 रुपयांच्या नाण्याबाबत कोणतेही आदेश नाही-
रिझर्व्ह बँकेने 10 रूपयांच्या नाण्यांना बंदीचे कोणतेही आदेश काढलेले नसताना अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ हे प्रकार थांबवण्याची गरज असताना बँकांकडून ठोस प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामीण भागातून येणा:यांना बसमध्ये किंवा इतर ठिकाणी मिळालेले 10 रूपयांचे नाणे खर्च करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकाकडे गेल्यास ते नाणे घेण्यास थेट नकार कळवत आहेत.
बँकांकडून जनजागृती आवश्यक-
 मोठे व्यावसायिकही हे नाणे स्विकारत नसल्याचे प्रकार शहरी भागात दिसून येत आह़े चलनात असलेले नाणे व्यवहारातून काढून टाकण्याच्या या प्रकारांमुळे नागरिकांची सर्वाधिक परवड होत असल्याने बँकांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आह़े 
दहा रुपयाचे नाणे चलणात कायम- महेश प्रभू 
10 रूपयांच्या नाण्यांना चलनातून काढण्याचे कोणतेही आदेश रिझव्र्ह बँकेचे नाहीत़ नंदुरबार जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रकार खोडसाळपणा आह़े बँकांनी आपपल्या ग्राहकांना आणि व्यापा:यांना याबाबत समज द्यावी, 10 रूपयांचे नाणे हे चलनाचा अविभाज्य भाग असल्याचे नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.  
200 रुपयांची नोट लवकरच-
देशात लवकरच 200 रूपयांच्या नव्या नोटा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ या नोटांची छपाई महिनाभरात पूर्ण झाल्यास त्या येत्या महिन्यात चलनात येतील असेही प्रभू म्हणाले.

Web Title: RBI may release 50 rupees note soon pics viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.