rbi keep repo rate unchanged | स्वस्त कर्जासाठी अजून थांबा! व्याजदरांमध्ये बदल नाही; RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी नवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो रेटही 5.75 टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला आहे. सलग तिस-यांदा भारतीय रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्या तेलाच्या किंमती आणि अर्थसंकल्पात केलेल्या अनेक नव्या घोषणा यांमुळे आरबीआय व्याजदर कमी करेल अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात होती, पण अखेर आझ आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं जाहीर केलं.  
काय असतो रेपो रेट ?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना.. बँका त्यांच्याकडे असलेला जास्तीचा निधी ठेवींच्या रुपात रिझर्व बँककडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.


Web Title: rbi keep repo rate unchanged
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.