Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:31 AM2019-02-17T07:31:06+5:302019-02-17T07:32:54+5:30

झहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे. 

Rawalpindi connection to Pulwama militant attack; Order from Azhar Pakistan Army Hospital | Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

श्रीनगर : काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनेच पाकिस्तानी लष्कराच्या तळावरून मंजुरी दिली होती, असा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. अझहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे. 

जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर हा पूर्वी काश्मीरमध्ये हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेत सक्रीय होता. त्याला भारतीय जवानांनी १९९४ मध्ये अटक केली. त्याच्या सुटकेसाठी अनेकदा  दहशतवाद्यांनी प्रयत्नही केले होते. पण, ते फसले होते. त्यानंतर २४ डिसेंबर १९९९ रोजी १८० प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. ते विमान कंदाहार येथे उतरवले. अपहृत विमान प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना सोडण्याची मागणी केली. सहा दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारताने या तिघांनाही सोडले. प्रवाशांना वाचवले. पण, मसूदने २००० साली ‘जैश’ची स्थापना केली व तिच्यामार्फत काश्मीरमध्ये कारवाया सुरू केल्या. त्याच्या संघटनेने आतापर्यंत भारतात अनेक हल्ले केले आहेत.
आजारी असल्याने मसूद जिहादी काऊन्सिलच्या (यूजेसी) गेल्या 6 बैठकांना हजर राहिला नव्हता. यूजेसी हे दहशवादी संघटनांची एक संघटना आहे जी भारताविरोधात कारवायांना पुरस्कृत करते. याच संघटनेचे संरक्षण पाकिस्तानद्वारा केले जाते. पुलवामा हल्ल्याच्या आधी 8 दिवस अझहरचे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. तेव्हा अझहरने त्यांच्यासाठी आजारी आवाजामध्ये संदेश ध्ननिमुद्रीत केला होता. 

ऑडिओ टेप मिळाली...
या ऑडियो संदेशामध्ये भाचा उस्मान याच्या मृत्यूचा बदला घेण्यास अझहर दहशतवाद्यांना सांगत आहे. उस्मानला 2018 मध्ये सुरक्षादलांनी ठार केले होते. या हल्ल्यात मृत्यूपेक्षा जास्त चांगली बाब कोणतीच असू शकत नाही, असे अझहरने म्हटले आहे. 

काश्मीरात जैशचे अद्याप 60 दहशतवादी
काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट जरी 100 टक्के केल्याचा दावा केला जात असला तरीही अद्याप जैश ए मोहम्मदचे 60 दहशतवादी लपलेले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. हे दहशतवादी त्यांचे प्रमुख उमेर, इस्माईल आणि अब्दुल राशीद गाजी यांच्यासह लपलेले आहेत. यापैकी 35 जण पाकिस्तानातून घुसखोरी करून भारतात आलेले आहेत. 

Web Title: Rawalpindi connection to Pulwama militant attack; Order from Azhar Pakistan Army Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.