विकृतीचा कहर, 5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 10:58 AM2018-04-26T10:58:51+5:302018-04-26T10:58:51+5:30

 देशभरात बलात्कारांविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केल्यानंतरही देशातील बलात्कारांचे सत्र थांबलेले नाही.

Rape on 5-year-old girls death Body | विकृतीचा कहर, 5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

विकृतीचा कहर, 5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

फरीदाबाद -  देशभरात बलात्कारांविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केल्यानंतरही देशातील बलात्कारांचे सत्र थांबलेले नाही. फरीदाबाद येथे एका नराधमाने 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका तरुणास अटक केली आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या काकांच्या ओळखीचा असल्याची बाब समोर आली आहे. 
ही घटना 21 एप्रिल रोजी घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार  या नराधमाने पीडित मुलीच्या काकासोबत मद्यपान केले होते. त्यानंतर त्याने तेथील मोबाईल आणि पैसे घेऊन पळ काढला. मात्र इरादा बदलल्यावर तो परत आला. मग घरात झोपलेल्या पीडित मुलीचे अपहरण करून त्याने तिला निर्मनुष्य ठिकाणी नेले. भीतीने गांगरलेली मुलगी रडू लागल्याने त्याने गळा आवळून तिची हत्या केली. पण एवढ्यावरच या आरोपीचे समाधान झाले नाही. डोक्यात सैतान शिरलेल्या आरोपीने मग तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. नंतर तो तिथून फरार झाला. मात्र घटना उघडकीस येताच पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपीला गाझीयाबाद येथून बेड्या ठोकल्या. 
नंतर आरोपीने दाखवलेल्या ठिकाणावरून पोलिसानी पीडित मुलीचा मृतदेत ताब्यात घेतला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहतास येथे पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.  

Web Title: Rape on 5-year-old girls death Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.