जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 08:01 AM2018-06-20T08:01:17+5:302018-06-20T08:26:41+5:30

भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं.

RamNath Kovind has approved imposition of Governors rule in jammu and kashmir with immediate effect | जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. 

काल भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल वोहरा यांनी मुफ्ती, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. 

एकूण 87 आमदार असलेल्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत पीडीपीचे सर्वाधिक 28 आमदार आहेत. तर भाजपाचे 25, नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. इतर पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांची संख्या 7 इतकी आहे. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यावर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नव्हता. त्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. 

Web Title: RamNath Kovind has approved imposition of Governors rule in jammu and kashmir with immediate effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.