ठळक मुद्देशारिरीक संबंधांचा आरोप झाल्यानंतर राम रहीम हायप्रोफाईल तरुणींना सिरसा येथे बोलवत असे.तरुणींची व्यवस्था करण्यापासून ते पुढील सर्व गोष्टींची जबाबदारी हनीप्रीतवर असेलाखो महिला अनुयायी उपस्थित असतानाही राम रहीम खुलेपणाने नग्न सेक्स वर्कर्ससंबंधी चर्चा करायचा

चंदिगड - दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या नातेवाईकांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितलं आहे की, शारिरीक संबंधांचा आरोप झाल्यानंतर राम रहीम हायप्रोफाईल तरुणींना सिरसा येथे बोलवत असे. इतकंच नाही तर कधी कधी तरुणींसाठी महिन्यातले 15 ते 20 दिवस मुंबईला शिफ्ट होत असे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भूपिंदर सिंह गोरा यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

तरुणींची व्यवस्था करण्यापासून ते पुढील सर्व गोष्टींची जबाबदारी हनीप्रीतवर असे. त्यांनी सांगितलं की, राम रहीम जास्तीत जास्त वेळ महिलांमध्येच घालवत असे. लाखो महिला अनुयायी उपस्थित असतानाही राम रहीम खुलेपणाने नग्न सेक्स वर्कर्ससंबंधी चर्चा करायचा. 

भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितल्यानुसार, राम रहीम प्रेमाच्या तीन पद्धती आहेत असं सांगायचा. यानुसार मिजाजी (वन नाइट स्टँण्ड), हाकिकी (खरं प्रेम) आणि रुहानी (दैवी प्रेम) असे तीन प्रकार आहेत असं राम रहीम सांगायचा. 'गुहेत एकदा एका महिला किंवा तरुणीची भेट घेतल्यानंतर पुन्हा तो तिला भेटायचा नाही. सोबतच त्याला भेटण्यासाठी इच्छुक असणा-या महिलांवर त्याची नजर असायची. सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी बाबा धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचं कारण महिलांना देत असते. पण खरं सांगायचं तर आजपर्यंत त्याने साधं एका धार्मिक पुस्तकालाही हात लावलेला नाही', असं भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितंल आहे. 

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे.  दरम्यान राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.