ठळक मुद्देडे-यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना राम रहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होतीएखादी तरुणी राम रहीमच्या विरोधात तर बोलत नाही ना याकडे विषकन्यांचं लक्ष असायचं

चंदिगड, दि. 13 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अनेक गुपित उघड होऊ लागली आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, डे-यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना राम रहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. या विषकन्या राम रहीमच्या अत्यंत निकट होत्या. इतकंच नाही तर या सगळ्या परिस्थितीचा सामना त्यांनीही केलेला असायचा. या विषकन्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत असत. बाबाने तुम्हाला आपलं खास अनुयायी बनवलं असून, आशिर्वाद देण्यासाठी बोलावलं आहे असं सांगून लबाडी केली जात असे. विषकन्या या तरुणींना सांगत की, बाबाने त्यांना पवित्र करण्यासाठी आणि आशिर्वाद देण्यासाठी आपल्या गुहेत बोलावलं आहे. 

फक्त इतकंच नाही, तर डे-यात एखादी तरुणी राम रहीमच्या विरोधात तर बोलत नाही ना याकडे विषकन्यांचं लक्ष असायचं. जे कोणी असं करताना आढळत असे, त्यांना 24 तास अन्न आणि पाणी दिलं जात नसे. ज्या तरुणी यानंतरही बंड मागे घेत नसत मानण्यास नकार देत असे, त्यांना 'मन सुधार' खोलीत पाठवलं जात असे. तिथे त्यांना खुर्चीला बांधून मारहाण केली जात असे. ज्या तरुणी आदेशाचं पालन करण्यास नकार देत असत त्यांनाही ही शिक्षा दिली जात असे. ज्या तरुणी रागाने पाहताना आढळत अस त्यांच्या चेह-यावर काळं फासून गाढवावरुन धिंड काढली जात असे. 

राम रहीमला शिक्षा होण्यामध्ये गुरदास सिंह टूर नावाच्या व्यक्तीची मुख्य भूमिका आहे. ते सीबीआयचे साक्षीदार होते. विषकन्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काही विषकन्या अद्यापही डे-यात उपस्थित आहेत. त्यामधील एक विषकन्या गरोदर होणा-या अनुयायांचा गर्भपात करण्याचं काम करते असा दावा त्यांनी केला आहे. 

पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले.  

या साध्वीनं अशीही माहिती दिली की, राम रहीमच्या बोलवण्यावरुन मुली गुहेत तर जायच्या, मात्र परत येण्यास असहाय्य असल्याने त्या तोंडातून 'ब्र' देखील काढू शकत नव्हत्या. गुहेत जाणा-या मुलींना धमकावण्यात यायचे. जर तुम्ही राम रहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीनं मुलींना घाबरवण्यात यायचे. एकेकाळी डेराशी संबंध असलेल्या या साध्वीनंही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर राम रहीमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिनं मासिक पाळीचं कारण दिलं व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.  

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे.