Rajya Sabha Vice President Election: रामदास आठवलेंची खास कविता, राज्यसभेत हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:35 PM2018-08-09T16:35:05+5:302018-08-09T16:36:20+5:30

मजेशीर कवितेवेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित

Rajya Sabha Vice President Election: rpi president ramdas athawale leaves house in laughter | Rajya Sabha Vice President Election: रामदास आठवलेंची खास कविता, राज्यसभेत हास्यकल्लोळ

Rajya Sabha Vice President Election: रामदास आठवलेंची खास कविता, राज्यसभेत हास्यकल्लोळ

Next

नवी दिल्ली : राज्यसभा उपसभापती निवडणुकीवेळी आज काहीसे तणावाचे वातावरण होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता ऐकवून हास्याचे कारंजे फुलविले. 
राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश सिंह यांनी विजय मिळविला. यानंतर सदस्यांनी आपले मत मांडले. यावेळी मंत्री रामदास आठवलेंचा नंबर आला. हरिवंश सिंह यांच्या सन्मानासाठी चक्क कविता म्हटली. ही कविता एवढी मजेशीर होती की उपस्थित सर्व सदस्यांसह पंतप्रधान मोदी जोरजोरात हसायला लागले. 
 हरिवंश सिंह यांचे अभिनंदन करताना आठवले म्हणाले की, ' आरपीआय की तरफ से हरिवंश को मै देता हूं शुभेच्छा... हरिवंश को आरपीआय की तरफ से मै देता हूं शुभेच्छा...हाऊस को अच्छे से चलाओ यही है मेरी इच्छा| मै हमेशा करता रहुंगा उनका पीछा... इसलिए मै आपको दे रहा हूं शुभेच्छा...मोदी जी ने हरिवंश को दिया है मौका....लेकिन हरिप्रसाद को काँग्रेसने दिया धोखा |'
आठवले  यांच्या कवितेच्या पंक्ती ऐकताना सदनातील सदस्य टेबल वाजवायला लागले. यानंतर मोदीही जोरजोरात हसत होते.

Web Title: Rajya Sabha Vice President Election: rpi president ramdas athawale leaves house in laughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.