Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:04 AM2018-03-23T08:04:32+5:302018-03-23T12:40:39+5:30

राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज निवडणूक होत आहे.

Rajya Sabha Elections 2018: 17 states 59 seat rajya sabha election | Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत

Rajya Sabha Election 2018 : उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगमुळे बसपाचा उमेदवार अडचणीत

googlenewsNext

नवी दिल्ली -  राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील  6 जागा महाराष्ट्रातून आहेत. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधील 6, मध्य प्रदेशातील 5 आणि आंध्र, ओडिशा, तेलंगणा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा, झारखंड 2, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि केरळसाठी प्रत्येकी एक-एक अशा जागा आहेत.  पैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले आहे. येथे बसपाचे आमदार अनिल सिंग यांनी क्रॉस व्होटिंग केल्याने बसपा उमेदवाराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

LIVE UPDATES :





 



 



 

10:43 AM लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीत बसपा आमदार अनिल सिंग यांनी केले क्रॉस व्होटिंग, भाजपा उमेदवाराला दिले मत   


 
















राज्यसभेसाठी 8 राज्यांत झाली बिनविरोध निवड

महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.
मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.

Web Title: Rajya Sabha Elections 2018: 17 states 59 seat rajya sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.