Rajasthan Elections 2018: Rajasthan CM Vasundhara Raje slams sharad yadav on his comments | Rajasthan Elections 2018 : 'हा तर महिलांचा अपमान'; शरद यादवांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंचा पलटवार
Rajasthan Elections 2018 : 'हा तर महिलांचा अपमान'; शरद यादवांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंचा पलटवार

ठळक मुद्दे'वसुंधरा राजे जाड झाल्यात, त्यांना आराम द्या', शरद यादवांचं वादग्रस्त विधानहा महिलावर्गाचा अपमान, शरद यादवांवर राजेंचा पलटवारवादग्रस्त विधानामुळे शरद यादवांवर होतेय चौफेर टीका

जयपूर -  माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधरा राजेंना आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते. यादव यांच्या या विधानावर वसुंधरा राजेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

वसुंधरा राजेंचा पलटवार
'शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकत नाही, तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे'.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजेंनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.शरद यादव यांचे वादग्रस्त विधान
शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा', असे विधान राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.  शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.  


Web Title: Rajasthan Elections 2018: Rajasthan CM Vasundhara Raje slams sharad yadav on his comments
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.