राजस्थानात शिवसेनेला 'अच्छे दिन'; भाजपाच्या नेत्याचा पक्षाला रामराम, उचलला 'धनुष्य-बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:25 PM2018-11-20T16:25:36+5:302018-11-20T16:26:51+5:30

भाजपा नेता शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार

Rajasthan assembly election BJP Leader Makes Shiv Sena Switch Days Ahead Of Elections | राजस्थानात शिवसेनेला 'अच्छे दिन'; भाजपाच्या नेत्याचा पक्षाला रामराम, उचलला 'धनुष्य-बाण'

राजस्थानात शिवसेनेला 'अच्छे दिन'; भाजपाच्या नेत्याचा पक्षाला रामराम, उचलला 'धनुष्य-बाण'

Next

जयपूर: निवडणुकीआधी उमेदवारांकडून होणारं पक्षांतर काही नवं नाही. आपल्याला तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता दिसताच नेते मंडळी नवा मार्ग शोधू लागतात. राजस्थानातही असंच घडलं आहे. भाजपाच्या नेत्यानं विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे हा नेता शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. राजस्थानात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 

अलवर जिल्ह्यातील भाजपाचे नेते श्रीकृष्ण गुप्ता यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. अलवर (शहर) विधानसभा मतदारसंघातून आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा गुप्ता यांना होती. मात्र गेल्या आठवड्यात भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. भाजपानं या मतदारसंघातून संजय शर्मा यांना तिकीट दिलं. सध्या बनवारीलाल या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तेदेखील भाजपाचे नेते आहेत. मात्र पक्षानं त्यांचाही पत्ता कापला. नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवून सरकारविरोधातील नाराजी टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 

तिकीट वाटप करताना भाजपानं वैश्य समाजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना गुप्ता यांनी पक्ष सोडताना बोलून दाखवली. 'ब्राह्मण समाजाचे मतदार कमी असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र वैश्य समाजाचे मतदार जास्त असतानाही त्यांना तिकीट वाटपात जाणीवपूर्वक डावलण्यात आलं,' असा आरोप गुप्ता यांनी केला. तिकीट वाटप करताना पक्षानं स्वत:चा आणि एजन्सीचा सर्व्हेदेखील विचारात घेतला नाही. त्यामुळे आपण पक्षाला रामराम करत असल्याचं गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.
 

Web Title: Rajasthan assembly election BJP Leader Makes Shiv Sena Switch Days Ahead Of Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.