Rajasthan Assembly Election 2018 : तेव्हा अवघ्या एका मताने पराभव अन् आता....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:35 PM2018-12-11T17:35:02+5:302018-12-11T17:35:32+5:30

राजस्थानमधील 2008 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एका मताने पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सीपी जोशी यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला. नाथद्वारा मतदारसंघातून डॉ.सीपी जोशी यांनी विजय मिळविला आहे. 

Rajasthan Assembly Election 2018 : congress leader dr c p joshi lost by one vote in 2008, but now? | Rajasthan Assembly Election 2018 : तेव्हा अवघ्या एका मताने पराभव अन् आता....

Rajasthan Assembly Election 2018 : तेव्हा अवघ्या एका मताने पराभव अन् आता....

Next

जयपूर : राजस्थानमध्ये परंपरेप्रमाणे दर पाच वर्षांनी सरकार बदलणार की यावेळी इतिहास घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही परंपरा कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. कारण, सत्ताधारी भाजपाचा सुपडा साफ झाला असून  काँग्रेसची एकहाती सत्ता राजस्थानमध्ये येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, राजस्थानमधील 2008 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एका मताने पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सीपी जोशी यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला. नाथद्वारा मतदारसंघातून डॉ.सीपी जोशी यांनी विजय मिळविला आहे. 

राजस्थानातील नाथद्वारा मतदारसंघातून डॉ. सीपी जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत डॉ. सीपी जोशी यांच्यासमोर 9 उमेदवारांचे तगडे आव्हान होते. मात्र, डॉ. सीपी जोशी यांनी 10 हजार 439 मतांनी विजय मिळवला आहे.

डॉ. सीपी जोशी यांचा 2008 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने पराभव झाला होता. त्यावेळी भाजपाच्या कल्याण सिंह यांनी डॉ. सीपी जोशींना पराभूत केले होते. कल्याण सिंह यांना त्यावेळी 62 हजार 216 मते मिळाली  होती, तर  डॉ. सीपी जोशींना 62 हजार 215 मते मिळाली होती. 
 

Web Title: Rajasthan Assembly Election 2018 : congress leader dr c p joshi lost by one vote in 2008, but now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.