Budget 2018 : लातुरातील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून ३० लाख नोक-या, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 03:46 AM2018-02-02T03:46:17+5:302018-02-02T04:49:56+5:30

वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपयांवरून वाढवून दीड लाख कोटी रुपये करण्याचा मनोदय व्यक्त केला.

 Railway Minister Piyush Goyal's claim of 30 lakh jobs in the steel coaches factory in Latur | Budget 2018 : लातुरातील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून ३० लाख नोक-या, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा

Budget 2018 : लातुरातील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून ३० लाख नोक-या, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा

Next

- विशेष प्रतिनिधी 
नवी दिल्ली : वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपयांवरून वाढवून दीड लाख कोटी रुपये करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याचप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला. या योजना नेमक्या काय आहेत? कधी सुरू होणार? याबाबत ‘लोकमत’ने रेल्वेमंत्री आणि मुंबईकर पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बजेटला आपण किती मार्क देता? तथापि, रेल्वेमंत्री असूनही आपण आपले भाषण वाचू शकला नाहीत याबाबत आपल्याला काही दु:ख नाही का? कारण, बजेट सादर करण्याचे अधिकार रेल्वेमंत्र्यांकडे आता राहिला नाही, असा सवाल केला असता पीयूष गोयल म्हणाले की, जेटली यांना मी १० पैकी ११ मार्क देतो. याचे कारण असे आहे की, यात सर्वांना न्याय देण्यात आला आहेच; पण रेल्वे बजेटसाठी यूपीए सरकारच्या तुलनेत तीन पट अधिक पैसा दिला आहे. राहिला मुद्दा भाषण वाचण्याचा, तर रेल्वे हा एक विभाग आहे, असे तर प्रत्येक विभागाला आपले बजेट वाचण्याची संधी द्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट निर्देश आहेत की, आम्ही केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. निकाल आपोआप येतील. हाच मंत्र स्वीकारून आम्ही काम करत आहोत.
या अर्थसंकल्पात रेल्वेला एवढा पैसा मिळाला आहे. याचा उपयोग कसा होणार? सामान्य प्रवाशांना काय लाभ होणार? असे विचारले असता गोयल म्हणाले की, रेल्वेसाठी एवढे बजेट दिल्याबद्दल पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मी आभार मानतो. यातील जवळपास ७३ ते ७५ हजार कोटी रुपये फक्त सुरक्षेसाठी खर्च होणार आहेत. याचा थेट सामान्य प्रवाशांना लाभ होणार आहे. एवढी मोठी रक्कम प्रथमच सुरक्षेवर खर्च होत आहे.
यामुळे रेल्वे उशिरा धावणे व उशिरा येणे ही परिस्थिती सुधारणार आहे का? प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. डब्यांची अवस्था वाईट आहे. असे विचारले असता ते म्हणाले की, ही परिस्थिती आहे हे मी मान्य करतो; परंतु हे का घडते हे समजून घेतले पाहिजे. आतापर्यंत फक्त रेल्वेगाड्याच चालवल्या जात होत्या. आम्ही रेल्वेरूळ बदलण्याचे काम सुरू केले आहे. ते काम वेगात सुरू आहे. आम्हाला ३००० किलोमीटर रेल्वेरूळ बदलण्याचे लक्ष्य दिलेले आहे. आम्ही जानेवारीअखेर ३६०० पेक्षा जास्त किलोमीटरचे काम पूर्णही केले आहे. मार्चअखेर ते काम ४.५ हजार किलोमीटरचे पूर्ण होईल. पुढच्या वर्षी गाड्या उशिरा धावणे व येणे हे पूर्णपणे बंद होईल. नवे डबे जोडले जातील. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरही वेगाने काम सुरू आहे.
मुंबईसाठी मोठी घोषणा झाली आहे. तिला कसा लाभ होईल? असे विचारले असता ते म्हणाले की, रेल्वेमंत्री व मुंबईकर या नात्याने मुंबईला उपनगरी मार्गांसाठी प्रथमच एवढे बजेट मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. नव्या मार्गांचा विस्तार करणे, नव्या एलिव्हेटेड कॉरिडॉरची तातडीने गरज आहे. आधीच सुरू असलेल्या ११ हजार कोटी रुपयांच्या योजनेबरोबर उपनगरी रेल्वेसाठी ४० हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
भजे विकणाºयाचे कामही तुम्ही नोकरी समजता, असा काँग्रेसचा आरोप आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसची अडचण ही आहे, की तो पक्ष कोणत्याही कामाला त्याचा स्वाभाविक सन्मान देत नाही. भजे विकणारी एक सन्माननीय व्यक्ती नाही का? चहा विकणाºयाचे काम हे सन्मानास पात्र नाही का? भजे किंवा चहा विकण्यातून रोजगार निर्माण होतो हे आपण स्वीकारले पाहिजे. अशा व्यक्तींच्या कामातून देशाच्या विकासाला हातभार लागत नाही का? या कामातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षही रोजगार निर्माण होत असतात. अशी अनेक क्षेत्रे समोर आली आहेत, की त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो, असा कधी कोणी विचारही केलेला नाही. यात फूल विकण्यापासून अ‍ॅपआधारित अनेक सेवांचा समावेश आहे.

रेल्वे बजेटमुळे महाराष्ट्रात रेल्वेची बरीच विकासकामे होतील. लातूरमध्ये रेल्वेडब्यांचा कारखाना सुरू झाला की, ३० लाखांपेक्षा जास्त नोक-या मिळतील. अर्थात या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा असतील.

मुंबई व इतर भागांत सुरू होणाºया कामांमुळे जवळपास ३० लाख नोकºया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्माण होतील. लातूर, नागपूर, वर्धा, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी लोकांना लाभ होणार आहे. हायस्पीड रेल्वे सुरू होण्याच्या प्रक्रियेनेही महाराष्ट्राला नोकरी व्यवसायाचा लाभ होईल.

Web Title:  Railway Minister Piyush Goyal's claim of 30 lakh jobs in the steel coaches factory in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.