पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 2:03am

आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.

सिंगापूर - आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला. सिंगापूरमधील कंपन्यांच्या भारतीय वंशाच्या प्रमुखांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नाही परंतु ‘कोºया पाटी’चा संदर्भ २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले जाण्याशी असावा. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने ‘२-जी’सह अन्य घोटाळ्यांवरून रान उठविले होते. राहुल गांधी म्हणाले की, सन २०१२मध्ये काँग्रेसने वादळ सोसले. सन २०१२ ते २०१४ या काळात सर्व व्यवस्था डळमळीत केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. आता आमची पाटी कोरी झाली आहे व नव्याने संधी मिळाली आहे. देशात शांतता व सलोखा राहावा यात भाजपाला काही स्वारस्य नाही, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस म्हणून आम्ही समाजाकडे जे संतुलन असायला हवे अशी व्यवस्था म्हणून पाहतो. याउलट भाजपाला शांतता व सामाजिक सलोख्याची फिकीर नाही. आमच्यापुढे आव्हाने आहेत. तरीही हे सामाजिक अभिसरण शांततेने, सर्वांना सोबत घेऊन व्हावे, असा प्रयत्न आहे. नेताजींना श्रद्धांजली राहुल गांधी यांनी सिंगापूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याखेरीज त्यांनी येथील सिंगापूर इंडियन असोसिएशनला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

संबंधित

शहा ज्यादा खा गया, राहुल गांधी यांंचा अहमदाबाद बँकेतील ७४५ कोटींवरून अमित शहांना टोला
देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे
देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे 
सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 
काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

राष्ट्रीय कडून आणखी

2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा
ओडिशाचा दशरथ मांझी, एकट्याने खोदला 3 किमी लांब कालवा
अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन 
9 दिवसांच्या आंदोलनानंतर केजरीवाल 10 दिवसांसाठी बंगळुरुला रवाना
Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

आणखी वाचा