rahul gandhi is unmarried that is why priyanka is entering politics now says bjp president amit shah | राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका राजकारणात, अमित शहांचं गांधी घराण्यावर टीकास्त्र
राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका राजकारणात, अमित शहांचं गांधी घराण्यावर टीकास्त्र

गोध्रा- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित शाह म्हणाले, राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. गुजरातमधल्या गोध्रा येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे. अमित शाह म्हणाले- राहुल गांधींचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. तसेच ते म्हणाले, भाजपामध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसं कधीही होणार नाही. शाह पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी भाजपाचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे.

एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आहे. काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता पंतप्रधान बनण्याचा विचार करू शकतो काय ?, काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाची जागा तर जन्मताच आरक्षित होते. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी एखाद्या विशेष कुटुंबात जन्म घेण्याची गरज नाही. 


Web Title: rahul gandhi is unmarried that is why priyanka is entering politics now says bjp president amit shah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.