पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:33 PM2018-06-13T12:33:09+5:302018-06-13T12:33:33+5:30

अडवाणींच्या अपमानाचा व्हिडीओ राहुल गांधींनी पोस्ट केला

Rahul Gandhi targets PM Modi through video for humiliating veteran BJP leader LK Advani | पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

googlenewsNext

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान करतात, अशी टीका राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये मोदी पंतप्रधान होण्याआधी आणि नंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी कसे वागले, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. आपल्या गुरुंचा आणि पक्षातील ज्येष्ठांचा अपमान करुन पंतप्रधान आपल्या संस्कृतीचं जतन करत आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
 
'एकलव्यानं त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदक्षिणा दिली होती. मात्र भाजपामध्ये स्वत:च्या गुरुंना बाजूला केलं जातं. वाजपेयीजी, अडवाणीजी, जसवंत सिंगजी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करुन पंतप्रधान भारतीय संस्कृतीचं जतन करत आहेत,' असा चिमटा राहुल गांधींनी काढला आहे. आज सकाळी राहुल यांनी हे ट्विट केलं. त्याआधी काल राहुल गांधी मुंबईत होते. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना भाजपामध्ये ज्येष्ठांचा अपमान होत असल्याचं म्हटलं होतं. 





'लालकृष्ण अडवाणी मोदींचे गुरु आहेत. मात्र मोदी त्यांचाही आदर करत नाहीत, हे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलं आहे. काँग्रेसनं अडवाणींना भाजपापेक्षा अधिक आदर दिला,' असं राहुल म्हणाले. भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना सन्मान दिला जात नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला. 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ते भाजपाचे असूनही मी त्यांचा आदर करतो. कारण त्यांनी या देशाचे नेतृत्व करल्यानं ते देशाचे नेते ठरतात. त्यामुळेच मी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हीच काँग्रेसची संस्कृती आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांवर शरसंधान साधलं होतं.

Web Title: Rahul Gandhi targets PM Modi through video for humiliating veteran BJP leader LK Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.