'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:35 PM2019-04-22T13:35:49+5:302019-04-22T14:07:31+5:30

राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे.

rahul gandhi expresses regret to supreme court in affidavit over remarks pm modi | 'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी

'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी

Next
ठळक मुद्दे पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण 'चौकीदार चोर है' असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले.

नवी दिल्ली - राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण 'चौकीदार चोर है' असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले आहे.

राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या ओघात केले आहे. मात्र माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र तसे काहीही माझ्या मनात नाही' असे स्पष्टीकरण दिले आहे. 



राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली.


'

चौकीदार चोर है' या राहुल गांधी याच्या वक्तव्याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित असल्याचे लेखी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी (21 एप्रिल) सुनावणी झाली. चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता.

 

Web Title: rahul gandhi expresses regret to supreme court in affidavit over remarks pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.