मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी बनले 'शिवभक्त'; रॅलीमध्ये शंखनाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 02:35 PM2018-09-17T14:35:11+5:302018-09-17T14:36:31+5:30

भोपाळमधील लालाघाटी ते दसरा मैदानापर्यंतच्या 13 किमीच्या रॅलीला त्यांनी सुरुवात केली. यावेळी भोपाळमध्ये जागोजागी लागलेले शिवभक्त राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या हातामधली गणेश मूर्ती काँग्रेसच्या हिंदुत्ववादी भुमिकेबद्दल बरेच काही सांगून जात होती.

Rahul Gandhi becomes 'Shivbhakta' in Madhya Pradesh | मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी बनले 'शिवभक्त'; रॅलीमध्ये शंखनाद

मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी बनले 'शिवभक्त'; रॅलीमध्ये शंखनाद

Next

भोपाळ : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेश निवडणुकीचा 'शंखनाद' केला. भोपाळमधील लालाघाटी ते दसरा मैदानापर्यंतच्या 13 किमीच्या रॅलीला त्यांनी सुरुवात केली. यावेळी भोपाळमध्ये जागोजागी लागलेले शिवभक्त राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या हातामधली गणेश मूर्ती काँग्रेसच्या हिंदुत्ववादी भुमिकेबद्दल बरेच काही सांगून जात होती.


गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट देत तेथील जनतेला हिंदुत्वाबाबत नरमाई घेतल्याचे दाखविले होते. हीच रणनिती त्यांनी मध्यप्रदेशमध्ये राबविण्याचे ठरविले आहे. तसेच राहुल हे नुकतीच मानसरोवर यात्राही करून आले आहेत. 




राहुल गांधी यांनी दुपारी 1 वाजता रॅलीला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ उपस्थित होते. रोड शोच्या आधी पूजा आणि शंखनाद करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते आपल्यासोबत गणपतीची मूर्ती घेऊन आले होते. यावरून काँग्रेसने हिंदुत्वाबाबत आपली भुमिका बदलल्याचे संकेत दिले आहेत. भोपाळमध्ये लागलेल्या फलकांवर राहुल गांधी यांचे शिवलिंगाची पूजा करतानाचे, टिळा लावलेले फोटो दिसत होते. 



एका मोठ्या चौकातील पोस्टरवर राहुल शिवलिंगावर पाणी ओतत असताना दिसत आहेत. तर त्यांच्या पाठीमागे कैलास मानसरोवरचा फोटो आहे. तसेच त्यांना शिवभक्ताची उपमा दिली आहे. परंतू या पोस्टरांवरून दिग्विजय सिंह यांचे फोटो गायब झाले आहेत.

Web Title: Rahul Gandhi becomes 'Shivbhakta' in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.