Raghuram Rajan rejected Rajya Sabha membership for this' cause | रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व

नवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, मी एक प्राध्यापक आहे. या कामातच मी समाधानी आहे. आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर पाठवण्याच्या ऑफरला त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

मी जेव्हा आरबीआयमध्ये होते, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीनं स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे, असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीनं राजन यांना दिल्लीतून राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली होती. राजन यांनी लोकाधिकार राष्ट्रवाद हे आर्थिक विकासासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं आहेत. खरं तर हा राष्ट्रवाद अल्पसंख्याक समुदायाला भेदभाव झाल्याचं भासवून उत्तेजित करतो. लोकाधिकार राष्ट्रवाद जगभरात सगळीकडेच आहे. भारतही त्यापासून बचावलेला नाही.

राजन म्हणाले, लोकाधिकार राष्ट्रवाद हा आर्थिक विकासाला नुकसान पोहोचवतो. हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. लोकाधिकार राष्ट्रवाद हा अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव करून वाद निर्माण करण्याचं काम करतो. विशेष म्हणजे लोकाधिकार राष्ट्रवाद हा भारतासह जगभरात पसरलेला आहे. राजकारणी लोकाधिकार राष्ट्रवादाच्या माध्यमातून लोकांच्या भावनांचा फायदा उचलतात. देशातील आरक्षणाचा मुद्दा हे त्याचंच द्योतक आहे.