लाहोरच्या प्रदूषणाला सरकार जबाबदार कसे?, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 4:52am

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लाहोरमधील प्रदुषणासाठी दिल्ली सरकारला जबाबदार कसे धरता?

संतोष ठाकूर नवी दिल्ली : दिल्ली आणि परिसरात शुक्रवारी चौथ्या दिवशी धूरमिश्रित धुक्याची चादर कायम होती. यामुळे लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबरपासून ५ दिवस वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. यावरुन एनजीटीने दिल्ली सरकारला धारेवर धरले आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लाहोरमधील प्रदुषणासाठी दिल्ली सरकारला जबाबदार कसे धरता? सम-विषम काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) आणि क्लस्टर बसमध्ये प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. डीटीसीकडे ४००० बस आहेत, तर १६०० क्लस्टर बस आहेत. मेट्रोशिवाय दिल्लीतील नागरिक या बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सम-विषम योजना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत लागू असणार आहे. मात्र यावर हरीत लवादाने शंका उपस्थित केली आहे. आम्ही नाही जबाबदार - केजरीवाल प्रदूषणाविषयी काळजी व्यक्त करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमचे सरकार सर्व उपाययोजना करत आहे, पण लाहोरमधील प्रदूषणाबाबतही जबाबदार ठरविणे हास्यास्पद आहे. भाजपाचे सरकार असलेल्या हरयाणातील गाजियाबाद, फरीदाबाद, गुडगावमध्ये याहून अधिक मोठी समस्या आहे. त्याबद्दल भाजपा बोलायला तयार काही. ही समस्या पंजाब, हरयाणातील शेतांत जो कृषी कचरा जाळला जात आहे, त्यामुळेच दिल्लीत समस्या निर्माण झाली आहे. त्या राज्यांत योग्य ती पावले उचलण्याऐवजी दिल्ली सरकारकडून पैसे मागून लक्ष विचलित केले जात आहे.

संबंधित

9 दिवसांच्या आंदोलनानंतर केजरीवाल 10 दिवसांसाठी बंगळुरुला रवाना
 'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका
अखेर नऊ दिवसानंतर केजरीवालांचे ठिय्या आंदोलन मागे; IAS अधिकाऱ्यांशी चर्चेचे आश्वासन
कुणाच्या घरात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? हायकोर्टाचा 'आप'ला सवाल
केजरीवालांसोबत जे घडतंय, ते लोकशाहीसाठी धोकादायक- शिवसेना

राष्ट्रीय कडून आणखी

आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी
पोलिसांचे मारेकरी शोधण्यासाठी मोहीम, संतप्त गावकऱ्यांची जवानांवर दगडफेक
बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा
पाकला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ - बिपिन रावत
'कमल का फूल हमारी भूल थी'; मानवेंद्र सिंह यांचा भाजपाला रामराम

आणखी वाचा