शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 04:14 PM2018-02-14T16:14:23+5:302018-02-14T16:22:17+5:30

शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे.

Quantity of Farmer's Future; Photo of Sunny Leone's Bikini photos, which are not applicable to the crops | शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो

शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो

googlenewsNext

हैदराबाद : शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील शेतकऱ्यानं हा पराक्रम केला आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, त्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात लाल बिकनी घातलेल्या सनी लिओनीचे एक पोस्टर लावले आहे. परिसरात या गोष्टीची चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यानं असा दावा केला आहे की, सनी लिओनीचे पोस्टर लावल्यानंतर शेतातील पिकामध्ये सुधारणा झाली आहे. 
नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली या गावातील ए.चेंचू रेड्डी  यांनी ही भन्नाट आयडिया केली आहे. शेतातील खराब होणाऱ्या पिकाला वाचवण्यासाठी त्यानं सनी लिओनीचं पोस्टर लावलं आहे. शेतीच्या दोन्ही बाजूला रेड्डी यांनी सनीचे पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवर 'मुझसे जलना मत' असे लिहण्यात आलं आहे. 

या आयडियावर बोलताना रेड्डी म्हणाले की, लोकांच्या मनात सनी लिओनीबद्दल आकर्षण आहे. म्हणूनच लोक शेतातील पिकाकडे न पाहता सनी लिओनीच्या पोस्टरकडे पाहतात. त्यामुळं वाईट नजरेपासून माझ्या पिकाचा बचाव होतोय. याचा फायदा मला मिळत आहे. सनी लिओनीचे फोस्टर लावल्यापासून पीक चांगलेच बहारले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बांदाकिंदिपल्ली या गावाच्या रस्त्यालगत रेड्डी यांची दहा एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी भाजीपाला लावला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्याची लागवड करत होते पण प्रत्येकवेळी पिक खराब होत असे आणि हवा तसा मोबदला मिळत नसे. 

Web Title: Quantity of Farmer's Future; Photo of Sunny Leone's Bikini photos, which are not applicable to the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.