नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:20 PM2019-05-22T12:20:03+5:302019-05-22T13:07:15+5:30

गेल्या आठवड्यात सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केले होते. धर्मिक पुस्तकातील उल्लेखावरून मुख्यमंत्री आणि अकाली दल यांच्यात सामोपचार झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केला होता.

punjab congress government four ministers demand resign from navjot singh sidhu | नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर असून त्यात काँग्रेसला मोठे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातील चार मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धू यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केले होते. धर्मिक पुस्तकातील उल्लेखावरून मुख्यमंत्री आणि अकाली दल यांच्यात सामोपचार झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केला होता. तर अमरिंदर सिंग यांच्यामुळे आपले तिकीट कापण्यात आल्याचा आरोप सिद्धू यांच्या पत्नीने केला होता. त्यावर सिद्धू म्हणाले होते की, आपली पत्नी कधीही खोट बोलत नाही. तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि पंजाब प्रचार समितीचे प्रमुख लाल सिंग यांनी देखील सिद्धू यांच्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. तर पंजाब सरकारमधील मंत्री त्रिपत राजेंद्र सिंह बाजवा, भारत भूषण आशू, श्याम सुंदर अरोडा आणि राणा गुरमीत सिंह यांनी देखील सिद्धू यांच्यावर निशाना साधला आहे. बाजवा म्हणाले की, सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नेतृत्व मान्य नसेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तसेच सिद्धू नैतिकतेने मजबूत असतील तर त्यांनी खुर्चीचा मोह सोडून द्यावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

बाजवा यांच्या सूरात सूर मिसळवत अमरिंदर यांनी देखील सिद्धूला टोला लगावला होता. मला मुख्यमंत्री पदावरून काढून सिद्धूला मुख्यमंत्री विराजमान होण्याची इच्छा असल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले होत. तेव्हापासून अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

Web Title: punjab congress government four ministers demand resign from navjot singh sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.