Pulwama Attack Live : जवानांची धडाकेबाज कामगिरी, 'जैश'च्या कमांडर्ससहीत 6 दहशतवादी ठार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:38 AM2019-02-18T09:38:54+5:302019-02-18T15:47:35+5:30

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाहीयेत. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे. पुलवाम्यातील पिंगलान ...

Pulwama Attack Live : Army Major, 3 other personnel killed in Pulwama's Pinglan encounter | Pulwama Attack Live : जवानांची धडाकेबाज कामगिरी, 'जैश'च्या कमांडर्ससहीत 6 दहशतवादी ठार

Pulwama Attack Live : जवानांची धडाकेबाज कामगिरी, 'जैश'च्या कमांडर्ससहीत 6 दहशतवादी ठार

Next

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाहीयेत. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे. पुलवाम्यातील पिंगलान परिसरात सोमवारी (18 फेब्रुवारी) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांविरोधात लढताना एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आले, तर एक जण जखमी झाला आहे. परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले आणि एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

यानंतर ज्या घरामध्ये दहशतवादी लपून बसले होते, ते घरच जवानांनी स्फोटकांनी उडवले. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Terror Attack )मास्टरमाइंड व 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझीला जवानांनी कंठस्नान घातले आहे. मात्र भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या या वृत्तास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

अब्दुल रशीद गाझी हा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. पुलवामा हल्ल्यानंतर गाझी आणि कामरान पसार झाले होते. दरम्यान, गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरचा सर्वात जवळील हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.  
पुलवामातील हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात होती. अखेर हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (18 फेब्रुवारी) 6 दहशतवाद्यांना ठार करून जवानांनी धडाकेबाज कामगिरी केली.

 

LIVE

Get Latest Updates

03:42 PM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना क्रिकेटपटू मोहम्मद शमीकडून मदतीचा हात



 

02:56 PM

बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - अमित शहा



 

02:55 PM



 

02:54 PM



 

02:54 PM



 

02:54 PM

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध



 

02:53 PM



 

02:52 PM

...तोपर्यंत पाकिस्तानसोबत खेळणार नाही - राजीव शुक्ला



 

02:52 PM

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी



 

01:46 PM



 

12:41 PM

जम्मूमध्ये कर्फ्यू



 

12:39 PM



 

12:39 PM

परिसरात शोधमोहीम सुरू



 

12:39 PM



 

11:40 AM

दोन दहशतवाद्यांचा खात्मा



 

10:48 AM

दहशतवादी लपलेले घर भारतीय जवानांनी स्फोटकांनी उडवले

10:28 AM

'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर जवानांनी घेरलं

'जैश-ए-मोहम्मद'च्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले



 

10:16 AM

शहिदांची नावे
1.मेजर व्हि.एस. धोंडियाल
2.शिओ राम
3. अजय कुमार
4. हरि सिंग
 



 

09:55 AM

पूंछपासून ते रावळकोटपर्यंतची बससेवा खबरदारी म्हणून खंडीत केली



 

09:46 AM

रविवारी उशीर रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन


09:45 AM



 

09:45 AM

चकमकीत एक जवान जखमी



 

09:44 AM



 

09:44 AM

व्यर्थ न हो बलिदान! 4 जवानांना वीरमरण


09:43 AM

पुलवामामध्ये चकमक सुरू



 

Web Title: Pulwama Attack Live : Army Major, 3 other personnel killed in Pulwama's Pinglan encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.