पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:16 PM2019-02-16T17:16:01+5:302019-02-16T17:18:38+5:30

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे.

pulwama attack exclusive the crpf colleague said before blast first stone pelting happen | पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे. आजतकच्या प्रतिनिधीनं हल्ल्याप्रसंगी घटनास्थळावर असलेल्या जवानांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती सापडली आहे. पुलवामा हल्ला प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एका जवानानं सांगितलं की, स्फोटाच्या पूर्वी वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या बसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्याच्या 10 मिनिटांनंतरच स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या बसला धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.

तर दुसऱ्या एका जवानानं सांगितलं की, त्या स्फोटाचा आवाज अजूनही आमच्या डोक्यातून जात नाही आहे. आम्ही सकाळी एकत्र निघालो होतो. जेवणही एकत्रच झालं होतं. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही हल्ला झाला त्या ठिकाणी आलो आणि अचानक ती कार बसवर आदळली आणि स्फोटकांचा स्फोट झाला. त्यानंतर अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली होती, तर इतर जखमी जवानांना आम्ही तात्काळ रुग्णालयात हलवले. आता आम्ही निष्ठेनं कर्तव्य बजावणार असून, दहशतवाद्यांचा योग्य बदला घेऊ, असंही या जवानांनी सांगितलं आहे. हल्ला झाला त्यावेळी बसचा वेग कमी होता. ज्या बसला लक्ष्य करण्यात आलं ती बुलेट प्रूफ नव्हती. एनआयएची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, हल्ल्याचा तपास सुरू आहे.

Web Title: pulwama attack exclusive the crpf colleague said before blast first stone pelting happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.