तेलंगणात प्रचार तोफा थंडावल्या, मतदानासाठी उमेदवार लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 08:35 PM2018-12-05T20:35:30+5:302018-12-05T20:36:23+5:30

तेलंगणात गेल्या 2 महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.

Publicity in Telangana stopped the, a candidate working for elections voting | तेलंगणात प्रचार तोफा थंडावल्या, मतदानासाठी उमेदवार लागले कामाला

तेलंगणात प्रचार तोफा थंडावल्या, मतदानासाठी उमेदवार लागले कामाला

Next

हैदराबाद - तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी शुक्रवार 7 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर गेल्या 2 महिन्यांपासून कडाडलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवारी सायंकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर, शुक्रवारी होणाऱ्या  मतदान प्रक्रियेला गती मिळाली आहे. तर, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी घेण्यावर उमेदवारांचा भर असणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील 2 कोटी 80 लाख 64 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

तेलंगणात गेल्या 2 महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. निवडणुकांच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून नागरिकांना खुश करण्यासाठी अनेक वचने देण्यात आली, अनेक आमिषे दाखविण्यात आली तर कित्येक उमेदवारांनी नागरिकांसमोर लोटांगणही घातले. सत्ताधारी टीआरएसने कल्याणकारी योजना आणि विकासाचे आश्वासन देत मतदारांना आवाहन केलं आहे. तर काँग्रेस आणि भाजपाने चंद्रशेखर राव यांच्यावर आगपाखड करत सत्ताबदल करण्याचे आवाहन जनतेला केलं आहे. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दिग्गजांनी सभा घेतल्या. तर ओवैसी बंधुनी मोदींवर आणि योगींवर तीव्र शब्दात टीका केली. यावेळी अकबरुद्दीन ओवैसींचा नेहमीप्रमाणे शाब्दीक तोल ढासळला होता. तर, योगींसह भाजपा उमेदवार टी राजासिंग यांनीही ओवैसींच्या धार्मिक मुद्द्यावरुन टीका केली. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता नेत्यांसह कार्यकर्ते नागरिकांशी गुपीत संवाद साधून अंतिम सामना खेळत आहेत. तर, तेलंगणातील 119 जागांसाठी सर्वच पक्षांचे मिळून 1821 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. त्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.  

तेलंगणातील 13 मतदारसंघात माओवाद्यांचा प्रभाव 
सिर्पूर, चेन्नूर (एससी), बेल्लमपल्ली (एससी), मंचिर्याल, आसिफाबाद (एससी), मंथनी, भूपालपल्ली, मुलुगु (एससी), पिनपाका (एसटी), इल्लंदु (एसटी), कोत्तागुड़ेम, अश्वारावपेट (एसटी), भद्राचलम (एसटी)  

दरम्यान, मतदान केंद्रांजवळील परिसरात कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कलम 1951 अन्वये 126 अंतर्गत निवडणुकांच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. 
 

Web Title: Publicity in Telangana stopped the, a candidate working for elections voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.