करणी सेनेचा ‘पद्मावत’ विरोध अखेर मावळला; राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:45 AM2018-02-04T05:45:58+5:302018-02-04T05:46:13+5:30

राजपूत करणी सेनेने आपला ‘पद्मावत’ चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला असून, या चित्रपटात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आले आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.

 The protesting 'Padmavat' of the serials ceased. The glorification of Rajputs | करणी सेनेचा ‘पद्मावत’ विरोध अखेर मावळला; राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच

करणी सेनेचा ‘पद्मावत’ विरोध अखेर मावळला; राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच

Next

मुंबई/जयपूर : राजपूत करणी सेनेने आपला ‘पद्मावत’ चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला असून, या चित्रपटात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आले आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.
चित्रपटाविरोधात चित्रीकरणापासूनच करणी सेनेने आंदोलन सुरू करून, जयपूरमधील सेट जाळला होता. चित्रपटात अलाउद्दीन खिलजी व राणी पद्मावतीचा रोमान्स दाखविल्याचा सेनेने निषेध केला होता आणि चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. तशी दृश्ये चित्रपटात नसल्याचा निर्वाळा वारंवार देऊ नही सेनेने हिंसक आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करावे लागले होते. भाजपाशासित राज्यांनी ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. (वृत्तसंस्था)

करणी सेनेचे नेते योगेंद्र सिंग कटार यांनी चित्रपटाविरोधातील आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामाडी यांच्या सूचनेनुसार काही सदस्यांनी ‘पद्मावत’ पाहिला. त्यात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. राजपूत समुदायाच्या भावना दुखावतील, असे कोणतेही दृश्य त्यात नाही.

‘पद्मावत’ चित्रपटाला पहिला विरोध राजस्थानातच झाला. तो प्रदर्शित होऊ नये, असा प्रयत्न राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या सर्व भाजपाशासित राज्यांच्या सरकारांनी केला. त्यानंतर, गुजरातमधील मल्टिप्लेक्स मालकांनीच तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. अखेर तीच संघटना हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.

पराभवानंतर आंदोलन मागे
राजस्थानातील दोन लोकसभा व एक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा नुकताच पराभव झाला आहे. भाजपाने ‘पद्मावत’ प्रकरणी राजपूत समाजाची फसवणूक केल्यामुळे आम्ही भाजपाला धडा शिकविला, असा दावा राजपूत समाजाच्या टिष्ट्वटर हँडलवरून काल करण्यात आला होता. भाजपाच्या पराभवाच्या दुसºयाच दिवशी करणी सेनेने ‘पद्मावत’ विरोधातील आंदोलन मागे घेतले.

Web Title:  The protesting 'Padmavat' of the serials ceased. The glorification of Rajputs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.