योगासनांना विरोध करणा-यांनी भारत सोडावा - योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे

By admin | Published: June 9, 2015 09:50 AM2015-06-09T09:50:35+5:302015-06-09T10:53:15+5:30

योगासनांना विरोध करणा-यांनी देश सोडावा, असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

The protesters should leave India - Yogi Adityanath's Muktafale | योगासनांना विरोध करणा-यांनी भारत सोडावा - योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे

योगासनांना विरोध करणा-यांनी भारत सोडावा - योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे

Next
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. ९ -  योगासनांना विरोध करणा-यांनी देश सोडावा, असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच, जे लोक सूर्यनमस्कार मानत नाहीत, त्यांनी समुद्रात बुडलं पाहिजे असेही ते म्हणाले.
'जे लोक सूर्यनमस्कार मानत नाहीत त्यांनी समुद्रात बुडलं पाहिजे किंवा अंधा-या खोलीत जीवन व्यतीत केलं पाहिजे. सूर्य कधीही प्रकाश आणि उर्जा देताना भेदभाव करत नाही, मग ज्यांना सूर्याला नमस्कार करायचा नाही त्यांनी स्वत:ला अंधारात कोंडून घ्यावे. असे लोक भारताची प्रतिष्ठा धुळीत मिळवत आहेत', असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 
२१ जून रोजी 'जागतिक योग' दिन असून त्या दिवशी सरकारतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: योगासने करणार आहेत. मात्र एमआयएमने योगदिनाला विरोध करत योगाची सक्ती करणे हे घटनेने नागरिकांना दिलेल्या आचार विचाराच्या स्वातंत्र्याच्या  विरोधी असल्याचे म्हटले आहे. त्यावरून वाद सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य करून या वादात आणखी भर घातली आहे. 

 

Web Title: The protesters should leave India - Yogi Adityanath's Muktafale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.