प्रेयसीला केले विमानात प्रपोज; सारेच चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:08 AM2018-05-23T00:08:06+5:302018-05-23T00:08:06+5:30

प्रियतमेसाठी सुखाचा धक्का : ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे दिली साद, गुडघा जमिनीवर टेकून दिले गुलाबाचे फूल

Priycebhai proposed in the plane; All amazed | प्रेयसीला केले विमानात प्रपोज; सारेच चकित

प्रेयसीला केले विमानात प्रपोज; सारेच चकित

Next

इंदूर : एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल, असाच तो प्रसंग होता. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला चक्क विमानात प्रपोज केले. या मधुर क्षणाचे साक्षीदार होते रविवारी इंदूरहून गोव्याला रवाना होणाऱ्या विमानातील प्रवासी. असे घडेल याची त्या प्रियतमेला कल्पना नसल्याने तिच्यासाठीही तो सुखद धक्का होता.
या प्रेमवीराचे नाव आहे नरेंद्र आनंदानी. तो मुळचा नागपूरचा, पण मनात काही ठरवूनच तो इंदूरला आला होता. कारण त्याच्या दिलाची धडकन इथूनच विमानाने गोव्याला जाणार होती. नरेंद्रच्या धडपडीला साथ होती इंदूर विमानतळ अधिकारी व विमानातील कर्मचाºयांची.
विमानात नरेंद्रची प्रियतमा आसनावर जाऊन बसल्यानंतर हे नाट्य सुरू झाले. तिला इंटरकॉमवरुन नरेंद्रचा आवाज ऐकू आला. सर्व प्रवाशांच्या साक्षीने त्याने तिला प्रपोज केले. विमानातच त्याने प्रेम स्वीकारण्याची घातलेली साद
हा तिच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. विमान कर्मचाºयांच्या सहकार्यामुळेच त्याला हे शक्य झाले. प्रेयसीच्या होकाराने आनंदानीचा आनंद गगनात मावेना. (वृत्तसंस्था)

कर्मचाऱ्यांच्या हाती प्रेमाचा फलक
या नाट्यात नरेंद्रच्या विनंतीनुसार कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रेयसीसमोर विमान फलक धरला. त्यावर लिहिले होते ‘विल यू मॅरी मी?'. तिनेही नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. अशा प्रकारे या प्रेमीजीवांचा विवाह अनोख्या रितीने विमानातच ठरला. ते याच विमानाने पुढे गोव्याला रवाना झाले.

तिने दिला हसून होकार
एअरोब्रिज व विमानात दोन्ही बाजूंच्या आसनांच्या मधोमध जी जागा असते तिथे नरेंद्र एक गुडघा जमिनीवर टेकून व हातात गुलाब घेऊन आपल्या प्रेयसीला सामोरा गेला. हिंदी नायकाच्या नजाकतीने त्याने तिला प्रपोज केले. या सुखद क्षणाने मोहरलेल्या तिने या प्रेमाचा गोड हसून स्वीकार केला.

Web Title: Priycebhai proposed in the plane; All amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.