इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:19 AM2019-02-11T08:19:11+5:302019-02-11T08:19:56+5:30

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी आहे, असे काँग्रेसमध्ये मानले जाते.

Priyanka Senna made on the lines of Indira Gandhi's apes | इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना

इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना

googlenewsNext

लखनऊ : काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी आहे, असे काँग्रेसमध्ये मानले जाते. यामुळे हा दावा खरा ठरविण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या वानरसेनेच्या धर्तीवर प्रियंका सेना तयार करण्यात आली आहे. 


आसाममधील सिचलरच्या खासदार सुष्मिता देव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गुलाबी रंगातील टीशर्ट आणि त्यावर प्रियंका सेना लिहिलेले फोटो टाकले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता या प्रियंका सेनेसोबत दिसत आहेत. 




इंदिरांची वानर सेना काय करायची? 
इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्याचा आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी युवकांसाठी वानर सेना बनविली होती. जी विरोध प्रदर्शन आणि आदोलने काढत होती. या वानर सेनेने स्वातंत्र्य लढ्यात खारीचा वाटा उचलला होता. 




 

Web Title: Priyanka Senna made on the lines of Indira Gandhi's apes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.