शहीद जवानाच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर; प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:17 AM2019-02-19T10:17:15+5:302019-02-19T10:22:47+5:30

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

priyanka gandhi says to pulwama martyr daughter i will help to your education | शहीद जवानाच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर; प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

शहीद जवानाच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर; प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

Next
ठळक मुद्देशहीद जवानाच्या मुलीला प्रियंका गांधींनी दिली मदतीचे आश्वासनईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यास मदत करेन - प्रियंका गांधी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधीलपुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उन्नावमधील काँग्रेसच्या माजी खासदार  अन्नू टंडन यांनी ईशाचा संपर्क प्रियंका गांधींसोबत संवाद घडवून आणण्यास मदत केली.  प्रियंका गांधींनी फोनवरुन ईशाला भविष्यात काय करायचे आहे? असे विचारले. त्यावर तिनं डॉक्टर  बनून जनतेची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर प्रियंका गांधींनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यास पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.

14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

Web Title: priyanka gandhi says to pulwama martyr daughter i will help to your education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.