पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:59 PM2018-08-20T23:59:28+5:302018-08-21T07:06:31+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी झटणार

Prime Minister Modi's support for the team | पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुजरातमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत घेतला.

माओवादी विरोधी आॅपरेशन यशस्वी झाल्याने, ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तरदायी बनविल्याने आणि जम्मू- काश्मिरात मेहबूबा मुफ्ती सरकारपासून वेगळे झाल्यामुळे आरएसएस नेतृत्व मोदी सरकारवर खूश आहे. अनेक दशकांपासून लढणाºया आरएसएस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.

आरएसएसच्या ज्येष्ठ सदस्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मोदी सरकारच्या यशासाठी आरएसएसचे कार्यकर्ते देशभरात काम करतील. यावर्षी मार्चमध्ये आरएसएस प्रतिनिधी सभा, निर्णय घेणारी समिती, प्रमुख संघटना व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सादरीकरण केले होते. हिंदंूना होणाºया त्रासाबाबत पूर्णवेळ प्रांत प्रचारकांसह २०० प्रतिनिधींनी सोमनाथमध्ये तीन दिवस विचारमंथन केले होते. या सर्वांनी एका आवाजात सांगितले की, मोदी सरकार हिंदू आणि आरएसएसच्या हितासाठी आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस भैय्याजी जोशी व सर्व सहा संयुक्त सरचिटणीस दत्तात्रय होसबळे, कृष्णा गोपाल, मनमोहन वैद्य आदींची या बैठकीला उपस्थिती होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीची आरएसएसची भूमिका परस्परविरोधी आहे. त्यावेळी अटलबिहारी आणि अडवाणी यांच्या काळात आरएसएसने भाजपसाठी मन लावून काम केले नव्हते.

Web Title: Prime Minister Modi's support for the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.