शहीद हेमंत करकरेंवरील विधानाबाबत प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:23 PM2019-04-19T21:23:59+5:302019-04-19T21:25:24+5:30

शहीद हेमंत करकरेंबाबत केलेल्या विधानामुळे चौफेर टीका होत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज अखेरीस माफी मागितली आहे.

 Pragya Singh apologized for the statement on Shaheed Hemant Karkare | शहीद हेमंत करकरेंवरील विधानाबाबत प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी 

शहीद हेमंत करकरेंवरील विधानाबाबत प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी 

Next

भोपाळ - शहीद हेमंत करकरेंबाबत केलेल्या विधानामुळे चौफेर टीका होत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज अखेरीस माफी मागितली आहे. माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना फायदा होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे हेमंत करकरेंबाबत केलेले वक्तव्य मी मागे घेत आहे. तसेच या विधानासाठी माफी मागते. हे माझे वैयक्तिक दु:ख होते, असे प्रज्ञा सिंह या माफी मागताना म्हणाल्या. 

 भाजपानेभोपाळ येथून उमेदवारी दिलेल्या  मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात असताना झालेल्या छळाचा उल्लेख केला होता. ."हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या  कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. त्यावरून आज सकाळपासून मोठा वाद निर्माण झाला होता.





 प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपाला जाब विचारण्यात येत होता. अखेर भाजपाने याबाबत एक पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली होती. हेमंत करकरे हे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले आहेत, असे भाजपाचे स्पष्ट मत आहे. भाजपाने करकरे यांना नेहमीच शहीद मानले आहे. हेमंत करकरेंबाबत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. अनेक वर्षांपासून झालेला शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. 



 

Web Title:  Pragya Singh apologized for the statement on Shaheed Hemant Karkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.