प्रद्युम्न हत्याकांड : 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 08:46 PM2017-11-08T20:46:10+5:302017-11-08T20:46:20+5:30

रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर यांच्या हत्येप्रकरणी याच शाळेतील 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला गुरुग्राम बालन्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

Pradyumna massacre: 11-year-old student gets CBI custody for three days | प्रद्युम्न हत्याकांड : 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

प्रद्युम्न हत्याकांड : 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

googlenewsNext

गुरुग्राम : रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर यांच्या हत्येप्रकरणी याच शाळेतील 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला गुरुग्राम बालन्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. 
येथील रायन इंटरनॅशनल शाळेत प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणा-या 11 वीच्या विद्यार्थ्याला अटक केली असून त्याला दुपारी गुरुग्रामच्या बालन्यायालयात हजर केले होते. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने असे म्हटले आहे, की रायन इंटरनॅशनल शाळेतील जवळपास 125 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची चौकशी केल्यानंतर या विद्यार्थ्याला अटक केली आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली अशी खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी प्रद्युम्नच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. 
दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले. सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतले. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केले होते. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचे कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असेही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असेही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असे अशोक कुमारने सांगितले.
 

Web Title: Pradyumna massacre: 11-year-old student gets CBI custody for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.